
घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांच्या सेवार्थी,सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर गेल्या सत्तावीस वर्षांपासून रंगपंचमी साजरी करत आहेत.

यावर्षी देखील प्रसिद्ध असलेल्या स्वराज्यातील "त्र्यंबकगड भंडारदुर्ग वर" रासायनिक रंगांच्या दुष्परिणामामुळे त्या रंगाला तिलांजली दिली

डीजेच्या कर्कश आवाजापासून दूर राहात,भांग, मदिरा, गुटका इतर व्यसनांपासून समाजाने दूर राहून आपला पारंपरिक रंगपंचमी सण साजरा करण्याचा संदेश दिला

गिर्यारोहकांनी स्वतः फुलांच्या पाकळ्या, गुलमोहोराचे पाने,हळद, मेहेंदी,डाळीचे पीठ घालून नैसर्गिक रंग तयार करून तो नैसर्गिक रंग एकमेकांना लावून त्र्यंबकगड भंडारदुर्ग किल्ल्यावर नैसर्गिक वातावरणात रंगपंचमी मोठ्या उत्साहात,आनंदाने साजरी केली.

या त्र्यंबकगड भंडारदुर्ग किल्ल्यावरील रंगपंचमी उत्सवात कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, अशोक हेमके, बाळासाहेब आरोटे, निलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर,डॉ. महेंद्र आडोळे, ज्ञानेश्वर मांडे,संजयमंत्री जाधव,आदेश भगत,गोकुळ चव्हाण,सुरेश चव्हाण,पांडुरंग भोर,सोमनाथ भगत,राहुल हांडे,जान्हवी भोर,संजीवनी भगत,अर्चित हेमके,पुष्कर पवार, यज्ञेष भटाटे सहभागी झाले होते.