Photo : भयानक… थेट टपरीत घुसून हल्ला; डुक्कराने थेट लोळवलच

आरे बापरे! भंडारा जिल्ह्यात चहाच्या टपरी आणि नाश्त्याच्या हॉटेलमध्ये थेट रानडुकर घुसल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

| Updated on: Aug 04, 2026 | 7:32 PM
1 / 5
भंडारा जिल्ह्यात एका चहाच्या टपरी व नाश्त्याच्या उपहारगृहात रानडुकराने घुसून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भंडारा जिल्ह्यात एका चहाच्या टपरी व नाश्त्याच्या उपहारगृहात रानडुकराने घुसून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

2 / 5

सकाळच्या वेळेत ग्राहक नाश्ता आणि चहा घेत बसले असताना अचानक एक रानटी डुक्कर सैरावैरा पळत दुकानात शिरले. या अनपेक्षित प्रकारामुळे दुकानात एकच गोंधळ उडाला आणि ग्राहकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.

3 / 5

याच दरम्यान रानडुकराने थेट शालिक भुरे (वय 60) यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करत रानडुकराला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रानडुक्कर तेथून पळून गेले.

4 / 5

घटनेनंतर जखमी शालिक भुरे यांना तातडीने भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

5 / 5

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us