
1996 साली 'राजा हिंदुस्तानी' चित्रपट रिलीज झालेला. आमिर खान-करिश्मा कपूरची जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. 6 कोटी रुपयाच्या बजेटमधील या चित्रपटाने 76.38 कोटी रुपयांची कमाई केली होती.

'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात आमिर खान-करिश्मा कपूर जोडीने उत्तम अभिनय केला होता. त्याशिवाय त्या चित्रपटातील किसींग सीन खूप गाजला होता.

आमिर खान आणि करिश्मा कपूरमधील हा किसींग सीन फेब्रुवारी महिन्यात ऊंटीच्या सुंदर डोंगर रागांमध्ये चित्रीत करण्यात आला होता.

'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात पावसाचा सीन आहे. त्यात आमिर खान करिश्मा कपूरला किस करतो. हा सीन त्यावेळी खूप गाजलेला. या सीनसाठी आमिर -करिष्मा जोडीने तब्बल 47 रिटेक दिले होते.

आमिर खान-करिश्मा कपूर जोडीचा एक मिनिटाचा किसींग सीन होता. या इंटिमेट सीनआधी दोघे थोडे टेन्शनमध्ये होते. हा एक किसींग सीन शूट करण्यासाठी 47 रिटेक आणि चार दिवस लागले होते. त्यानंतर परफेक्ट शॉट मिळाला होता.