AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ज्याची भीती तेच घडणार? भारत होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवणार? सरकारच्या भूमिकेने ट्रम्प यांची झोप उडाली!

Indian Warships : होर्मुजच्या सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांशी संपर्क साधून या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. यावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अखेर ज्याची भीती तेच घडणार? भारत होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवणार? सरकारच्या भूमिकेने ट्रम्प यांची झोप उडाली!
Indian WarshipImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 16, 2026 | 9:36 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुजच्या सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. हा मार्ग जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांशी संपर्क साधून या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र यातील अनेक देशांनी युद्धनौका पाठवण्यास विरोध केला आहे. अशातच आता भारत या भागात युद्धनौका पाठवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता याबाबत सरकारने आपली भूमिका जाहीर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत होर्मुजमध्ये युद्धनौका पाठवणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांना होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे. यात चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम यांच्यासह अनेक देशांचा समावेश होता. यातील काही देशांनी युद्धनौका पाठवण्यास नकार दिला आहे. यानंतर आता भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धनौका तैनात करण्यासाठी अमेरिकेसोबत द्विपक्षीय चर्चा करत आहे का? या प्रश्नावर बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘भारत अशी कोणतीही तैनाती करण्याचा विचार करत नाही.’ असं स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?

होर्मुजमध्ये युद्धनौका पाठवण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘या विषयावर अनेक देशांशी चर्चा सुरू आहे, मात्र भारत आणि अमेरिका यांच्यात याबाबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. भारत या विषयावर विविध हितधारकांशी संवाद सुरू ठेवेल.’ भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे भारत आणि इराण यांच्यातील संबंध भूतकाळापासून चांगले आहेत. भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी, ‘भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुजमधून सुरक्षितपणे जाण्यासाठी इराणसोबत चर्चा सुरू आहे. यातून सकारात्मक परिणाम मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर भारताची दोन एलपीजी वाहक जहाजे शिवालिक आणि नंदा देवी यांनी सुरक्षितपणे होर्मुजची सामुद्रधुनी पार केली होती.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल