Abhijeet Dipke : हल्ला झाला, तुरुंगात डांबलं तरी…अभिजीत दीपकेंचा नवा निर्धार, काय बोलून दाखवलं!

सरकार लोकांच्या मतदानाच्या अधिकारावर निर्बंध आणू पाहतंय. एसआयआरच्या माध्यमातून निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकला जातोय, असा गंभीर आरोप दीपके यांनी केला.

| Updated on: Nov 07, 2026 | 9:47 PM
1 / 5
अभिजीत दीपके तसेच कॉकरोच जनता पार्टीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला जात आहे. याच मागणीला घेऊन आज कोची येथे सीजेपीने मोठे आंदोलन केले. या आंदोलनात दीपके यांनी सरकारवर सडकून टीका केली. तसेच नवा निर्धार बोलून दाखवला.

2 / 5

सरकार लोकांच्या मतदानाच्या अधिकारावर निर्बंध आणू पाहतंय. एसआयआरच्या माध्यमातून निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकला जातोय, असा गंभीर आरोप दीपके यांनी केला.

3 / 5

दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर तिरंगा विनापरवानी प्रवेश करत दीपके यांच्या सहकाऱ्यांनी तिरंगा फडकवला. त्यानंतर या आंदोलकांनात तुरुंगात टाकण्यात आले होते. याच अटकेचा आधार घेत आम्हाला किती जरी अटकेची भीती दाखवली तर मी तिरंगा फडकावणारच, असा निर्धार दीपके यांनी बोलून दाखवला.

4 / 5

देशात जिथे कुठे जाईन, तिथे तिरंगा सोबत असेल. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ किंवा तामिळनाडू कुठेही अटक केली तरी आपण पुन्हा परतणारून पुन्हा तिरंगा फडकवणार, असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर सडकून टीका केली.

5 / 5

निवडणुकांमध्ये एका विशिष्ट पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी गैरप्रकार होत आहे. देशात पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक व्यवस्था निर्माण होईपर्यंत CEC विरोधातील संघर्ष सुरूच राहील, असेही यावेळी दीपके यांनी बोलून दाखवले. तुम्ही माझ्यावर हल्ला केला किंवा मला अटक केली तरीही तिरंग्याला घेऊन माझी यात्रा सुरूच राहील, असा निर्धारही दीपके यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us