
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील काही वस्तू अशा आहेत ज्या दिल्यास घरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्या कोणत्या गोष्टी किंवा वस्तू आहेत ज्या शेजाऱ्यांनी मागितल्यावर देणे शक्यतो टाळलेच पाहिजे. विशेषत: संध्याकाळच्या वेळी तर नाहीच दिले पाहिजे. ते जाणून घेऊयात.

तांदूळ : ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात तांदळाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. तुमच्या शेजाऱ्याला तांदूळ उधार दिल्याने तुम्हाला शुक्र दोषाचा त्रास होऊ शकतो. शुक्र दोषामुळे घरात तणाव आणि संघर्ष निर्माण होतो आणि नकारात्मक ऊर्जा देखील वाढते.

मोहरीचे तेल : ज्योतिषशास्त्रात मोहरीचे तेल शनी ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या शेजाऱ्यांना कधीही मोहरीचे तेल देऊ नका. हे अशुभ मानले जाते.

दूध : वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, दुधाचे चंद्राशी संबंध आहे. दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ एखाद्याला देणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमचा चंद्र दूषित होऊ शकतो.

हळद : हळदीचा संबंध गुरु देवता बृहस्पतिशी असल्याचे मानले जाते. हळदीचे दान केल्याने किंवा उधार दिल्याने गुरु दोष होऊ शकतो.

लसूण आणि कांदा : केतू ग्रहाचा संबंध लसूण आणि कांद्याशी असल्याचे मानले जाते. जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला लसूण किंवा कांदे उधार दिले तर तुमच्या घराची समृद्धीवर परिणाम होतो असे म्हटले जाते.

मीठ : वास्तुशास्त्रानुसार, मीठ कधीही उधार देऊ नये. मीठ सांडणे आणि उधार देणे दोन्ही अशुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक अडचणी येऊ शकतात.