
साऊथ स्टार नागा चैतन्य याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नागा चैतन्य याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नागा चैतन्य सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलाय.

गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा आहे की, नागा चैतन्य हा अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करतोय. मात्र, दोघांनीही कधीच त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये. मात्र, काही खास फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.

सतत दावा केला जातोय की, एक्स पत्नी समांथा रूथ प्रभू हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून शोभिता धुलिपाला हिला नागा चैतन्य डेट करत आहे. आता जे फोटो शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यचे व्हायरल होत आहेत, त्यामध्ये दोघांच्याही फोटोचे लोकेशन एकच दिसत आहे.

दोघांनीही फिरायला गेलेले वेगवेगळे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, दोघांचेही फोटोचे लोकेशन एकच दिसत आहेत. यामुळे हा अंदाज लावला जातोय की, दोघे एकसोबतच फिरण्यासाठी गेले.

याबद्दल चाहते हे नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांना सतत प्रश्न विचारताना दिसत आहेत. हेच नाही तर मध्यंतरी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसली.