निर्वस्त्र व्हायला सांगितलं… ऑडिशन दरम्यान विचित्र मागणी, या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

'तुझा ब्लाऊज काढ...' ऑडिशन दरम्यान क्राइम पेट्रोलमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचबाबत धक्कादायक अनुभव.

| Updated on: Jun 02, 2026 | 11:35 AM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री मुस्कान वार्ष्णेय सध्या तिच्या 'जीना दिल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असताना तिने एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या प्रवासासह कास्टिंग काउचच्या अनुभवाबाबतही खुलासा केला आहे.

टीव्ही अभिनेत्री मुस्कान वार्ष्णेय सध्या तिच्या 'जीना दिल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असताना तिने एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या प्रवासासह कास्टिंग काउचच्या अनुभवाबाबतही खुलासा केला आहे.

2 / 5

'फिल्मीमंत्रा'ला दिलेल्या मुलाखतीत मुस्कान म्हणाली की, तिच्यासोबत थेट गैरवर्तन करण्याची हिंमत फार कमी लोकांनी केली, कारण तिचा स्वभाव ठाम आणि निर्भीड आहे. मात्र, ती 16 वर्षांची असताना संगीत क्षेत्रातील एका प्रसिद्ध व्यक्तीने तिला म्युझिक व्हिडिओसाठी संपर्क साधला होता.

3 / 5

त्या व्यक्तीने प्रत्यक्ष ऑडिशनऐवजी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर ऑडिशन घेण्याचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला तिला सलवार सूट आणि साडी परिधान करून विविध पोझेस दाखवण्यास सांगितले. सर्व काही सामान्य वाटत असताना अचानक त्या व्यक्तीने तिला ब्लाऊज काढण्यास सांगितले. ऑफ-शोल्डर लूक कसा दिसेल हे पाहायचे असल्याचे कारण त्याने दिले.

4 / 5

हा प्रकार ऐकून मुस्कानला धक्का बसला. तिने त्याला याबाबत प्रश्न विचारताच तो गोंधळला आणि दुसऱ्या कॉलचे कारण देत संभाषण संपवले. मुस्कानच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे प्रयत्न त्या व्यक्तीकडून अनेकदा झाले.

5 / 5

मात्र, त्याने कधीही थेट अयोग्य प्रस्ताव दिला नाही. जर तसे झाले असते तर तिने त्याला तात्काळ विरोध केला असता असेही तिने स्पष्ट केले. मुस्कानच्या या खुलाशामुळे मनोरंजन क्षेत्रातील कास्टिंग काउचचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us