
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारत प्रत्येक घरात पोहोचलेली सुंदर अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad). तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे अनेक चाहते आहेत. हीच प्राजक्ता आता आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरूवात करत असून आज (2 डिसेबंर) तिचा विवाह होणार आहे. शंभुराज यांच्यासोबत ती विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा संगीत सोहळा आणि हळद पार पडली. त्याच्या काही खास फोटोंची झलक... (Photos : Instagram)

ऑगस्ट महिन्यात प्राजक्ताचा साखरपुडा झाला, तिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत होणाऱ्या पतीबद्दल सर्वांना सांगितलं होतं. तिच्या फोटोंवर खूप लाईक्स, कमेंट्स आले. त्यानतंर गेल्या महिन्यात तिने लग्नपत्रिकेचा फोटो टाकत लग्नाची तारीख जाहीर केली.

आज (2 डिसेंबर) होणाऱ्या विवाहसोहळ्यापूर्वी प्राजक्ता- शंभुराज यांची हळद आणि संगीत सोहळा पार पडला. हळदी समारंभात दोघांनीही धमाल केली. पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या काँबिनेशन ड्रेसमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत होती.

त्यांच्या हळदीचे फोटो खूप व्हायरल झाले असून प्राजक्ताने होणाऱ्या पतीसह खूप धमाल केली. त्यांच्या फोटोंवर हजारो कमेंट्स आल्या असून सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संगीत सोहळ्यातही प्राजक्ताच्या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या संगीत सोहळ्यात सर्वांनी खूपच धमाल केली.

पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत आलेले शंभुराज आणि गोल्डन-निळा लेहंगा अशा अटायरमध्ये आलेली प्राजक्ता, दोघांची जोडी खूप उठून दिसत होती. त्यांनी अनेक गाण्यांवर सुंदर डान्सही केला.

या संगीत सोहळ्यात प्राजक्ता आईसोबत तसेच इतर कुटुंबियांसोबतही नृत्य करताना दिसली. उपस्थित सर्वांनीही या संगीत सोहळ्याचा पुरेपूर आनंद लुटला.

प्राजक्ता एकदा शूटिंगसाठी जात होती, तिला नव्या घराची खरेदीही करायची होती. अचानक एक ट्रक आला आणि तिच्या गाडीला थोडा धडकला. प्राजक्ता प्रचंड चिडली. तिने त्या ट्रक चालकाला मालकाला बोलाव असे म्हटले. तेवढ्यात शंभूराज तेथे आले. त्यांनी कोणताही विचार न करता ट्रक ड्रायव्हरच्या कानशिलात लगावली. हीच त्यांची पहिली भेट होती. त्यानंतर त्यांची ओळख वाढली , मैत्री झाली नंतर काही दिवसांनी दोघांनी घरी बोलण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे त्यांचं लग्न ठरलं.