
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीहीमुंबईतील वेगवेगळ्या परिसारारतील दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा देत , आयोजकांचे आभारही मानले. त्यांनी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

नगरसेविका हेमांगी वरळीकर आयोजित वरळी शाखा क्र. 193 येथील दहीहंडी उत्सवास भेट दिली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तसेच सहभागी गोविंदा पथकांना भेटून शुभेच्छा दिल्या.

माहीम विधानसभेचे विभागप्रमुख महेश सावंत जी आयोजित प्रभादेवी येथील दहीहंडी उत्सवास उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.

युवासेनेतर्फे शिवसेना भवन येथे आयोजित 'निष्ठा दहीहंडी'स भेट देऊन सहभागी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत दहीहंडी उत्सवात शिवसेना नेते आदेश बांदेकरही सहभागी झाले होते