MI vs PBKS IPL 2025 : IPL 2025 मध्ये हरुनही मुंबई इंडियन्सची टीम मालामाल, मिळणार इतके कोटी रुपये

MI vs PBKS IPL 2025 : IPL 2025 मध्ये क्वालिफायर 2 चा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये झाला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला पाच विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. टुर्नामेंटमधून मुंबईची टीम बाहेर गेली. मात्र, तरीही मुंबईच्या टीमला कोट्यवधी रुपयाचा पुरस्कार मिळणार आहे.

| Updated on: Jun 02, 2025 | 12:43 PM
1 / 5
IPL 2025 चा क्वालिफायर 2 मॅच एक रोमांचक सामना ठरला. यात पंजाब किंग्सने पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. या पराभवासह मुंबई इंडियन्सच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. मात्र, तरीही मुंबई इंडियन्सला या स्पर्धेतील शानदार कामगिरीबद्दल कोट्यावधी रुपयाच प्राइज मनी मिळणार आहे. (PHOTO- PTI)

2 / 5
BCCI कडून या सीजनच्या प्राइज मनीसाठी कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मागच्यावर्षी होती तितकीच IPL 2025 साठी प्राइज मनी असेल असं बोललं जातय. या वर्षी पुरस्काराची रक्कम 46.5 कोटी रुपये असू शकते. टुर्नामेंटच्या चार टॉप टीम्समध्ये ही रक्कम वाटली जाईल. (PHOTO- PTI)

3 / 5
मुंबई इंडियन्सने पूर्ण टुर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन केलं. एलिमिनेटरच्या सामन्यात गुजरात टायटन्सला 20 धावांनी पराभूत केलं. क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. पंजाब विरुद्ध आपला फॉर्म कायम राखता आला नाही. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 203 धावा केल्या. पण टार्गेटचा बचाव करण्यात मुंबईची टीम कमी पडली. (PHOTO- PTI)

4 / 5
मुंबई इंडियन्सला हा बोचणारा पराभव आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या टीमने 200 रन्स बनवूनही पराभवाचा सामना करावा लागला. याआधी 18 वेळा मुंबईची टीम 200+ प्लस धावांच टार्गेट डिफेंड करताना यशस्वी ठरली आहे. (PHOTO- PTI)

5 / 5
मागच्यावर्षी तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या टीमला 7 कोटी रुपयाची रक्कम मिळाली होती. यावेळी मुंबई इंडियन्सचा प्रवास तिसऱ्या स्थानावर संपुष्टात आला. या शानदार प्रदर्शनसाठी मुंबई इंडियन्सला 7 कोटी रुपयांची रक्कम मिळू शकते. (PHOTO- PTI)