
बॉलीवूड चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप चित्रपटाच्या पडद्यापासून आणि लाइमलाइटपासून दूर असूनही अनेकदा सोशल मीडियावर खळबळ माजवताना दिसते.

आता अलीकडेच तिने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर वर्चस्व गाजवले आहे. तिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबतचे काही इंटिमेट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ही छायाचित्रे आलिया आणि शेन युरोप व्हेकेशनमधील आहेत, ज्यामध्ये आलिया आणि शेन क्रोएशियामध्ये एकत्र काही वेळ एन्जॉय करताना दिसत आहेत

?☀️??❤️????? असे कॅप्शन देत आलियाने असे कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे.

तिच्या या फोटोना नेटकऱ्यांनीही उदंड प्रतिसाद मिळला आहे. एका युझरने लिहिले आहे की, "किती सुंदर छायाचित्रे आहेत", दुसर्याने लिहिले, "तुम्ही लोक किती छान दिसत आहे".

आलिया आणि शेन दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही व्यवसायाने YouTubers आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्हिडिओ शेअर करत राहतात.