
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची सून आणि अनंत अंबानी यांची पत्नी राधिका मर्चंट ही कायमच तिच्या साधेपणासोबतच लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. तिची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.

नुकतंच राधिका मर्चंट आणि तिची सासू नीता अंबानी यांचा एका पार्टीत एंट्री घेतानाचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले. यावेळी राधिकाच्या हातात असलेल्या स्मार्टफोनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तसेच ती नेमका कोणता फोन वापरते याबद्दलची माहिती समोर आली आहे.

राधिका अंबानीने पार्टीत पर्ससोबतच मोबाईल हातात ठेवला होता. त्यावेळी तिच्या फोनच्या मागील पॅनलवरील कॅमेरा कटआउट आणि डिझाईनवरून राधिका ही आयफोन 16 प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) सिरीजचा स्मार्टफोन वापरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, राधिकाने पार्टीवेअरला जुळणारे कव्हर या महागड्या फोनवर घातले होते. ज्यामुळे तो अधिक आकर्षक दिसत होता. आयफोन 16 प्रो मॅक्स गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच झाला होता, परंतु कंपनीने आता तो बंद केला आहे.

लाँचच्या वेळी भारतात त्याची सुरुवातीची किंमत ₹१,३४,९०० (२५६ जीबी स्टोरेजसाठी) होती. टॉप-एंड (१ टीबी स्टोरेज) व्हेरिएंटची किंमत ₹२ लाख पर्यंत होती. आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला होता.

ज्यात ४८ एमपीचा प्रायमरी सेन्सर, ४८ एमपीचा सेकंडरी कॅमेरा आणि १२ एमपीचा थर्ड सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १२ एमपीचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.