
जया बच्चन या प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. पत्नी नवऱ्याला नेहमी साथ देते. पण जया बच्चन अमिताभ यांचा हा चित्रपट फार वेळ नाही पाहू शकल्या.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आजही अनेक चित्रपटात काम करतायत. त्यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत. पण अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीत असेही काही दिवस आले की, त्यांचे लागोपाठ चित्रपट फ्लॉप झाले.

करियर उतरणीला असताना 1997 साली अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट रिलीज झाला. मृत्यूदाता या सिनेमाच नाव होतं. मृत्यूदाता सिनेमाच स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. जया बच्चन सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या.

चित्रपटाच स्क्रीनिंग सुरु असताना जया बच्चन या अर्ध्यावरुन उठून गेल्या होत्या, हे पाहून मला धक्का बसलेला असं अमिताभ बच्चन म्हणाले. बिग बी अमिताभ यांनी खुलासा केला की, "जया बच्चन यांना मृत्यूदाता चित्रपट बिलकुल आवडला नव्हता. हा चित्रपट वाईट पद्धतीने आपटलेला"

अमिताभ बच्चन मृत्यूदाता चित्रपटातून 5 वर्षानंतर कमबॅक करणार होते. पण जया बच्चन हा चित्रपट फारवेळ नाही पाहू शकल्या.