
झोप म्हटलं की कोणला प्रिय नसते. झोप ही अशी गोष्ट आहे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी नक्कीच महत्त्वाची असते. त्यामुळे झोप ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

प्राणी असोत किंवा कोणताही माणूस प्रत्येकासाठी झोप महत्वाची असते. जे प्राणी, पक्षी रात्री जागतात अगदी ते सुद्धा दिवसा झोपतात. म्हणजे झोप ही प्रत्येकासाठी फार गरजेची गोष्ट आहे.

आपण जर पुरेशी झोप नाही घेतली तर शरीरासोबतच मेंदूचेही तीन तेरा वाजतात.आणि आपण अगदी बसल्या जागीही झोपू शकतो. पण तुम्हला माहितीये का एक असा प्राणी किंवा किटक आहे जो कधीच म्हणजे आयुष्यभर झोपत नाही.

बरं हा किटक सर्वांच्या घरात आढळतो. मुळात हा प्राणी खूप मेहनती आहे पण तरीही थकूनही त्याला झोप येत नाही. तो आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच झोपत नाही. तुमच्या लक्षात आलं का?

हा प्राणी आहे मुंगी. होय, दिसायला अगदी एवढीशी असणारी मुंगी त्यांच्या संपूर्ण जीवन चक्रात कधीही झोपत नाही. वास्तविक, मुंग्यांना पापण्या नसतात. त्यामुळे ते डोळे बंद करू शकत नाहीत. पण त्यांना यात काही अडचण येत नाही.

कीटतज्ञांच्या म्हणण्यानुसार मुंग्यांच्या मेंदूमध्ये झोपेचा नियंत्रक भागच नसतो, तसेच त्यांच्या तंत्रिका मंडलात रात्र-दिवसाचा फरकही नसतो. म्हणून त्या रात्रंदिवस काम करू शकतात. त्यांना निसर्गाने असं तयार केलं आहे की त्यांच्यात सातत्याने काम करण्याची क्षमता असते.

मुंग्या झोपत नसल्या तरी पावर नॅप म्हणजे डुलकी घेतात. ही डुलकी 1 मिनीटांपेक्षा जास्त नसते. मुंग्या दिवसाला 250 डुलकी घेतात. म्हणजे 4 तास 48 मिनीटांने आराम करतात.आहे ना रंजक माहिती. आपण मुग्यांबद्दल कधी एवढा विचार नक्कीच केला नसेल.