
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता एकत्र नाहीयत. काही दिवसांपूर्वी एका इवेंटमध्ये अर्जुनने तो आता सिंगल असल्याच सांगितलं. एकप्रकारे त्याने ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.

आता हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने ब्रेकअप, डिप्रेशन, फेलियर्स आणि ऑटोइम्युन डिसऑर्डरबद्दल तो बोललाय. 'सिंघम अगेन'मधल्या रोलवर तू कसं लक्ष केंद्रीत केलस असा प्रश्न त्याला विचारला. त्यावेळी ब्रेकअप आणि माइल्ड डिप्रेशन दोघांचा तो सामना करत होता.

डिप्रेशनचा सामना करण्यासाठी मी थेरेपीचा आधार घेतला. त्यावेळी त्याला समजलं की, त्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर हाशिमोटो झालाय. हाशिमोटो आजार हा थायरॉयडच एक्सटेंशन आहे. या आजारात थायरॉयड ग्रंथीवर परिणाम होतो. यामुळ थकल्यासारख वाटतं. वजन वाढतं.

अर्जुन कपूर एकटेपणाबद्दल सुद्धा बोलला. आईला गमावल्यानंतर मी आणि बहिण अंशुलाने एकटेपणाचा सामना केलाय. सुरुवातीला करियरमध्ये यश मिळालं. पण एकटेपणा जाणवायचा. तो यातून बाहेर निघाला.

जर, तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तर तुम्ही त्या बद्दल बोललं पाहिजे असं अर्जुन कपूरच मत आहे. सध्या सिंघम अगेन चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. या फिल्ममध्ये अर्जुनने खलनायक रंगवला आहे.