58 पॉर्न व्हिडीओ पोलिसांच्या हाती कसे लागले? खरात घरात… इनसाइड स्टोरी आली समोर

नाशिक येथील प्रसिद्ध ज्योतिषी अशोक खरातवर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा केल्यानंतर त्याला अटक केली. आरोपी खरात यांचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन पोलिसांनी गुप्त प्लॅन तयार केला होता. हा प्लान काय होता जाणून घ्या...

| Updated on: Mar 21, 2026 | 12:47 PM
1 / 6
नाशिक येथील प्रसिद्ध ज्योतिषी आणि कॅप्टन अशोक खरात सध्या चांगलाच चर्चेत आहे. स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यवक्ता म्हणवणाऱ्या अशोक खरातने काही महिलांवर अत्याचार केले. त्यामधील एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर खरातला अटक करण्यात आली. त्यांच्या घरात पोलिसांना एक पेनड्रायव्ह सापडला. या पेन ड्रायव्हमध्ये 58 पॉर्न व्हिडीओ सापडले. आता कॅप्टन खरातला अटक कशी झाली याची इनसाइट स्टोरी समोर आली आहे.

2 / 6
एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर तक्रारीनंतर महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय वेगवान आणि गोपनीय कारवाई करत आरोपीला जाळ्यात टाकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलनंतर सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये राजकीय-प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन विशेष रणनीती आखण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया इतकी गुप्त ठेवण्यात आली की, बातमी लीक होण्याची शक्यताही नव्हती.

3 / 6
फिर्यादी महिला तक्रार देण्यास तयार होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश मिळताच पोलिस यंत्रणा ‘अॅक्शन मोड’वर आली. आरोपी खरात यांचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन पोलिसांनी गुप्त प्लॅन तयार केला. बातमी बाहेर जाऊ नये म्हणून संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले.

4 / 6
सुरुवातीला तक्रारीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला, त्यात खरात यांचे नावही टाळण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांना फक्त ‘बंदोबस्त’चे आदेश देण्यात आले. खरी माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली गेली. एकूण पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकाला फक्त आपले काम कळवण्यात आले, कोणालाही संपूर्ण प्लॅनची कल्पना नव्हती.

5 / 6
सिव्हिल ड्रेसमधील एक टीम दिवसभर खरात यांच्या घराजवळ तैनात ठेवण्यात आली. क्राईम ब्रँच आणि गुंडा स्कॉडचा या ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग होता. संशय टाळण्यासाठी पोलिसांनी ‘परिसरात चोर घुसला’ असा बहाणा केला. चोर शोधण्याच्या नावाखाली पोलिसांनी घरात शिताफीने प्रवेश केला. एक टीम घराच्या आत शोधमोहीम राबवत होती, तर दुसरी टीम बाहेर कडेकोट पहारा देत होती. शोधमोहीम राबवत असलेल्या टीमने पेनड्रायव्ह शोधला. त्यामध्ये जवळपास 58 पॉर्न व्हिडीओ सापडले

6 / 6
खरात घरात असल्याची खात्री झाल्यावर वरिष्ठांना गुप्त संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर क्राईम ब्रँचने तत्काळ आरोपीला ताब्यात घेत अटकेची प्रक्रिया सुरू केली. अटकेनंतर खरात यांच्या कुटुंबीयांनी गोंधळ करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रभावशाली व्यक्तींना फोन करून मोठ्या प्रमाणात दबाव आणण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, पोलिसांनी कोणत्याही दबावाला जुमानले नाही आणि प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले.

Follow Us