
माणसाच्या काही वाईट सवयी ग्रह दोष उत्पन्न करतात. जाणून घ्या कोणत्या चूकांमुळे ग्रह दोष लागतो. जे लोक पाय घासून चालतात, त्याचा राहु खराब होतो. त्यांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक आघाडीवर नुकसान होतं.

ज्या लोकांना ओरडून बोलण्याची सवय असते, त्यांचा शनी खराब होतो. म्हणून नेहमी दुसऱ्यांशी आदराने बोलावं.

जे लोक सकाळी उठल्यावर आपला बिछाना व्यवस्थित करत नाहीत, त्यांच्या जीवनात अडचणी येतात. त्यांचा राहू आणि शनी खराब होतो.

जे लोक बाथरुम आणि किचनमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेत नाहीत, त्यांच्या कुंडलीत ग्रह दोष आपली जागा निर्माण करतो.

जे लोक अपशब्दत उच्चारतात, शिव्या देतात, त्यांचा गुरु आणि बुध खराब होतो. ज्योतिष शास्त्रानुसार माणसाने या चूका चुकूनही करु नयेत. अन्यथा जीवनात अडचणींचा सामना करावा लागले.