
पपई तुम्हाला खायला आवडत असेल. पण आरोग्य सांभाळायचं असेल तर पपई खाल्ल्यांनंतर काही गोष्टी खाणं टाळावे. असे कोणते पदार्थ आहेत जे चुकूनही पपई खाल्ल्यानंतर खाऊ नयेत, बघुयात...

पपई आणि लिंबू! तुम्ही पपई खाल्ल्यानंतर पटकन लिंबू खाऊ शकता पण याने तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान आहे. तुम्ही पपई आणि लिंबू एकत्र खाणं टाळायला हवं. या दोन गोष्टी लागोपाठ खाल्ल्याने व्यक्तीला अशक्तपणा येऊ शकतो.

संत्री आणि पपई ही दोन विपरीत फळे आहेत. एकतर संत्री खावी नाहीतर पपई. पपई हे मुळातच उग्र असण्यानं त्या नंतर काय खावं याचा विचार करायला हवा. पपई खाऊन संत्री खाल्ल्याने अतिसार, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते.

दही थंड, पपई उग्र! या दोन्हीचं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक. पपई आणि दही लागोपाठ खाल्ल्यास डोकेदुखी, सर्दी आणि नाक वाहणे होऊ शकते. त्यामुळे दोन्हीही एकत्र खाऊ नये असा प्रयत्न करा.

पपई हे उग्र फळ आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते पपई नंतर दुधाचे सेवन चुकूनही करू नये. पपई आणि दूध लागोपाठ खाऊ नये.जर तुम्ही पपई खाऊन लगेचच दूध प्यायला तर तुम्हाला बद्धकोष्ठता, अतिसार, पोटात सूज येणे अशा समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी खायच्या असतील तर त्या दोन्हीमध्ये दीड तासाचं अंतर हवं.