
केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हेच नाही तर केळी खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत होते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत केळी सर्वांसाठीच फायदेशीर ठरते.

केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. मात्र, हिवाळ्यात केळी खाणे फायदेशीर ठरते का? हा प्रश्न उपस्थित केला जातो.

कारण थंडीच्या हंगामात केळी खाल्ल्याने सर्दीसोबतच कफ होऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे असते. चला तर जाणून घेऊयात थंडीच्या हंगामात केळी खाणे फायदेशीर ठरते का?

हिवाळ्यात शक्यतो केळी खाणे टाळावे. कारण केळी थंड असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मुख्य म्हणजे सर्दीची अधिक शक्यता निर्माण होते.

जर तुम्हाला केळी खाण्याची इच्छा होत असेल तर अशावेळी दुपारी केळी खावी. रात्री आणि सकाळी केळी खाणे टाळा. ज्यामुळे सर्दी होण्याची शक्यता अधिक असते.