
वसंत पंचमी (Vasant Panchami) हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा विशेष दिवस देवी सरस्वतीला (Saraswati)समर्पित आहे. या दिवशी, भक्त विशेषतः विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा करतात आणि प्रार्थना करतात . या दिवसाला पंढरपूरात ही विषेश महत्त्व आहे.

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर राज्याचे आराध्यदैवत असणारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होत आहे.

देवाच्या विवाह सोहळ्यासाठी रुक्मिणीमातेस खास रेशमी साडी तर विठ्ठलास रेशमी पोशाख तयार करण्यात आला आहे.मात्र कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर मंदिरात भाविकाना विवाह सोहळ्यासाठी येता येणार नसुन विवाह सोहळा हा अगदी मर्यादीत भक्तामध्येच पार पडत आहे.

विवाह सोहळ्यासाठी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या प्रतिकात्मक मूर्तीना दागदगिने आणि भरजरी पोषाखात नटवले आहे.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या प्रतिकात्मक मूर्तीना पाहून मंडपातील सर्वच भाविक भारावून गेले. दागदगिन्यांमध्ये देवाचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे.

या सोहळ्यासाठी 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे.