
दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले, तरी त्याचे पूर्ण फायदे तेव्हाच मिळतात. जेव्हा ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ले जाते. आयुर्वेदात दही खाण्याची वेळ आणि पद्धत याबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.

आयुर्वेदानुसार, दही हे थंड असते. त्यामुळे ते दुपारी खाणे सर्वात उत्तम आहे. या वेळी पचनशक्ती चांगली असते आणि शरीर दह्याचे पोषक घटक सहजपणे शोषून घेते.

दह्यात प्रोबायोटिक्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. यात असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तुम्ही भाजलेल्या जिऱ्यासोबत दही खाल्ल्यास पचनसंस्थेसाठी ते अधिक फायदेशीर ठरते. यामुळे पोटाच्या समस्या जसे की बद्धकोष्ठता किंवा अपचन दूर होण्यास मदत होते.

दह्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. ज्यामुळे शरीराची ऊर्जा पातळी वाढते. तसेच जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल आणि तुम्ही नियमितपणे दही खाल्लात, तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने सर्दी, खोकला, सायनस आणि कफ वाढू शकतो. कारण दह्याचा गुणधर्म थंड असतो आणि रात्रीच्या वेळी शरीराचे तापमान कमी होते. यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

थंडीच्या दिवसांमध्ये, विशेषतः सकाळी किंवा रात्री दही खाणे टाळावे. दह्यामध्ये भाजलेली जिरेपूड टाकून खाल्ल्यास ते पचनासाठी अधिक उपयुक्त ठरते. तसेच दह्यामध्ये साखर किंवा मीठ घालून खाल्ल्याने चव वाढते आणि त्याचे फायदे मिळतात.