अमित शाह यांच्या पुणे दाैऱ्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची जोरदार बॅनरबाजी, हॉटेल परिसरात बॅनरच बॅनर..
अमित शाह पुणे दाैऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पुण्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. त्यातच भाजपालाही एकनाथ शिंदेंच्या पक्षाने मागे टाकले. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने जोरदार बॅनरबाजी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमित शाह पुणे दाैऱ्यावर असताना एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
अमित शाह सेनापती बापट रोडच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये थांबले आहेत. तिथे भाजपापेक्षा कितीतरी जास्त पट्टीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बॅनर बघायला मिळत आहेत.
अमित शाह यांच्या स्वागताकरिता हे बॅनर लावण्यात आलीत. हॉटेलकडे जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यात शिंदेंच्या शिवसेनेने फुल बॅनरबाजी केली. इथे भाजपालाही शिंदे गटाने मागे टाकल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावली आहेत. हॉटेलकडे जाणाऱ्या या सर्व बॅनरने सर्वांच्या लक्ष वेधले आहे. भाजपाकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही बॅनर लावली आहेत.
शिवसेनेचे स्थानिक नेत्यांनीही बॅनरबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादाची चर्चा होत आहे.त्याच पार्श्वभूमीवर आता ही बॅनरबाजी दिसून येत आहे.