बँकेच्या लॉकरची चावी हरवली? घाबरू नका, नवीन चावी मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

बँकेच्या लॉकरची चावी हरवल्यास तातडीने संबंधित शाखेला माहिती देणं महत्त्वाचं आहे. बँकेच्या नियमानुसार ओळख पडताळणी, लेखी अर्ज आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते.

| Updated on: Oct 12, 2026 | 7:49 PM
1 / 7
घरातली एखादी साधी चावी हरवली, तर आपण लगेच डुप्लिकेट चावी बनवून घेतो. पण बँकेच्या लॉकरची चावी सहरवली तर मात्र प्रकरण थोडं वेगळं असतं. कारण या लॉकरमध्ये महत्त्वाची कागदपत्रं, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात. अशा वेळी चावी हरवली तर कशी मिळवायची आणि त्याची प्रोसेस काय आहे जाणून घ्या.

घरातली एखादी साधी चावी हरवली, तर आपण लगेच डुप्लिकेट चावी बनवून घेतो. पण बँकेच्या लॉकरची चावी सहरवली तर मात्र प्रकरण थोडं वेगळं असतं. कारण या लॉकरमध्ये महत्त्वाची कागदपत्रं, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात. अशा वेळी चावी हरवली तर कशी मिळवायची आणि त्याची प्रोसेस काय आहे जाणून घ्या.

2 / 7

बँकेच्या लॉकरसाठी दोन वेगवेगळ्या चाव्या असतात. त्यापैकी एक चावी बँकेकडे तर दुसरी ग्राहकाकडे असते. लॉकर उघडण्यासाठी दोन्ही चाव्यांची आवश्यकता असते.मात्र ग्राहकाकडे असलेल्या चावीची अतिरिक्त प्रत बँकेकडे असेलच अस नाही. त्यामुळे चावी मिळवण्याची काय प्रक्रिया आहे जाणून घ्या.

3 / 7

लॉकरची चावी हरवल्याचं लक्षात येताच संबंधित बँकेच्या शाखेला तातडीने कळवावं. बँक ग्राहकाची ओळख तपासून आवश्यक कागदपत्र आणि लेखी हमीपत्र मागू शकतात. काही बँका त्यांच्या अंतर्गत प्रक्रियेनुसार पोलिसात तक्रार करण्यास सांगू शकतात.

4 / 7

चावी हरवल्यानंतर बँक लॉकरचा क्रमांक आणि त्याच्या नमुन्याची माहिती लॉकर तयार करणाऱ्या कंपनीला देते. त्यानंतर कंपनीचा अधिकृत तंत्रज्ञ बँकेत येऊन लॉकरची तपासणी करतो. ती मिळवणं शक्य नसेल,तर लॉकरचं कुलूप तोडलं जातं.

5 / 7

लॉकर उघडण्यासाठी किंवा तो फोडण्यासाठी वेळ आल्यास ग्राहकाची लेखी परवानगी घेतली जाते.ही प्रक्रिया बँक किंवा तिच्या अधिकृत तंत्रज्ञानामार्फत केली जाते.

6 / 7

लॉकरची चावी हरवल्यानंतर नवीन चावी मिळवणे, कुलूप बदलणे, लॉकर तोडणे यासाठी ग्राहकाला खर्च करावा लागतो.काही प्रकरणांमध्ये हा खर्च हजारो रुपयांपर्यंत जातो.

7 / 7

ही प्रक्रिया लगेच पूर्ण होत नाही. लॉकरची तपासणी, तंत्रज्ञाची उपलब्धता आणि आवश्यक कागदपत्र यानुसार या प्रक्रियेला वेळ लागतो. काही प्रकरणांमध्ये याला 15 दिवस तर काही वेळेस त्याही पेक्षा जास्त दिवस लागू शकतात..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us