AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP News: शरद पवारांनी भाकरी फिरवली! थेट प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य मुंबई महिला अध्यक्ष पदी संगीता वाझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संगीता वाझे यांची राज्य मुंबई महिला अध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

NCP News: शरद पवारांनी भाकरी फिरवली! थेट प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी कोण?
NCP News
| Updated on: Nov 26, 2026 | 9:20 PM
Share

Sharad Pawar NCP News:  राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे रोहित पवार यांनी एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचीही चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीत मोठे बदल

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य मुंबई महिला अध्यक्ष पदी संगीता वाझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संगीता वाझे यांची राज्य मुंबई महिला अध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  त्याचबरोबर ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत पक्षाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे. “पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत, मुंबईतील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा हातभार लागेल असा विश्वास आहे,”असं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.

‘एकला चलो’ची चाचपणी, रोहित पवारांनी दिले स्पष्टीकरण? 

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी शेतकरी न्याय हक्क मोर्चाचे आयोजन केले आहे, मात्र यामध्ये त्यांनी पक्षाचे चिन्ह, झेंडा न वापरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. रोहित पवार यांच्या या खेळीमागे एकला चलोची भूमिका आहे का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र रोहित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आंदोलनाला राजकीय वळण लागू नये म्हणून पक्षाचा झेंडा  वापरत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला