AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor : आईसमोरच अभिनेत्याला केलं किस, करिश्मा कपूरनं ‘त्या’ सीनसाठी घेतले तब्बल 47 रीटेक, काय घडलं?

Karisma Kapoor Kissing Scene : करिश्मा कपूरनं एका गाजलेल्या सिनेमात तिच्या आईसमोर किसिंग सीन दिलेला. त्या सीनसाठी जवळपास 47 रिटेक घ्यावे लागले होते.

Karisma Kapoor : आईसमोरच अभिनेत्याला केलं किस, करिश्मा कपूरनं 'त्या' सीनसाठी घेतले तब्बल 47 रीटेक, काय घडलं?
| Updated on: Nov 26, 2026 | 9:12 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरनं आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. 90 च्या दशकात करिश्मानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’. या चित्रपटात ती अभिनेता आमिर खान याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा कायम चर्चेत असतो. आमिरसोबत किसिंग सीन शूट करताना करिश्माची आई बबिता सेटवर उपस्थित होती.

करिश्माने स्वतःहून केली होती दिग्दर्शकांकडे विनंती

‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही अनुभव सांगितले. चित्रपटातील एका पार्टीच्या सीनमध्ये आमिर खान नशेत असतो आणि करिश्माच्या व्यक्तिरेखेचा सर्वांसमोर अपमान करतो. याच सीनमध्ये आमिरनं करिश्माचे केस पकडून तिला ओढायचं होतं. मात्र, हा सीन शूट करताना आमिर खानला काहीसं अवघडल्यासारखं झालं. त्यानं दिग्दर्शकांना केस ओढण्याऐवजी करिश्माचा हात पकडून तिला खेचण्याचा पर्याय सुचवला होता. आमिरचं म्हणणं दिग्दर्शकांनाही योग्य वाटलं. मात्र, करिश्माला हा सीन अधिक वास्तववादी पद्धतीनं शूट करायचा होता. त्यामुळे तिनं स्वतः दिग्दर्शकांना बाजूला घेऊन या सीनबद्दल विनंती केली. आपल्या आजोबांना खऱ्या आयुष्यात असं वागताना पाहिलं असल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यानंतर दिग्दर्शकांनी आमिरला तसाच सीन शूट करण्यास सांगितलं.

धर्मेश दर्शन यांनी करिश्माच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचंही कौतुक केलं. करिश्मानं यापूर्वी कधीही किसिंग सीन शूट केला नव्हता. त्यामुळे हा सीन नेमका कसा चित्रित केला जाणार आहे, याची माहिती दिग्दर्शकांनी तिला दिली होती. तिचा कॉस्च्युम आणि सीनबद्दलही तिला समजावून सांगण्यात आलं होतं. करिश्माची आई बबिता यांनाही संपूर्ण सीन समजावून सांगण्यात आला होता. त्यावेळी करिश्मा वयानं लहान असल्यानं तिच्या आईला याबाबत माहिती देणं आवश्यक असल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. बबिता तब्बल तीन दिवस चित्रपटाच्या सेटवर उपस्थित होत्या. दिग्दर्शकांनीही त्यांना सेटवरून जाण्यास सांगितलं नाही. काही मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी आणि जवळपास 47 रीटेक घ्यावे लागले होते.

‘राजा हिंदुस्तानी’ ठरला होता सुपरहिट

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला