माझी आई पुन्हा जिंकू दे, प्रितम मुंडेंचा मुलगा आजोबांच्या चरणी लीन
बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रीतम मुंडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅली आणि सभेच्या माध्यमातून विराट शक्तीप्रदर्शन करत प्रितम मुंडे यांचा अर्ज भरण्यात आला. त्याआधी पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला वंदन केलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी प्रितम मुंडे यांचा 5 वर्षांचा मुलगा अगस्त्यही उपस्थित […]
Sachin Patil | सचिन पाटील |
Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रीतम मुंडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅली आणि सभेच्या माध्यमातून विराट शक्तीप्रदर्शन करत प्रितम मुंडे यांचा अर्ज भरण्यात आला.त्याआधी पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला वंदन केलं.महत्त्वाचं म्हणजे यावेळी प्रितम मुंडे यांचा 5 वर्षांचा मुलगा अगस्त्यही उपस्थित होता. चिमुकला अगस्त्यही गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचं पाहून, अनेकांना भारावून आलं.आश्वासनांची पूर्तता झाली आहे, म्हणूनच पक्षान संधी दिली आहे. आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे. मी माझं काम करत राहीन. मुंडे साहेब होते त्यावेळी मी राजकारणातच नव्हते, ना कधी आले असते. विकासाच्या मुद्यावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ही निवडणूक जिंकू, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रितम मुंडे यांनी दिली.प्रितम मुंडे यांनी आई प्रज्ञा मुंडे यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्या दोन्ही बहिणी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे आणि सर्वात छोटी बहीण यशश्री मुंडेही उपस्थित होत्या.दरम्यान, आज बीडमध्ये संध्याकाळी भाजपची सभा होत आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. भाजपने रॅली आणि सभेची जय्यत तयारी केली असून प्रमुख शिलेदारांवर नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.“खासदार प्रितम मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. विद्यमान खासदारांना बीडमधून पुन्हा एकदा संधी दिली आहे. आश्वासनांची पूर्तता आणि विकासाच्या मुद्यावरच ही निवडणूक जिंकू. विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना सभेत उत्तर देऊ”, असं यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितलं.