
पाकिस्तान ( Pakistan ) - हिंदी पाकिस्तानात जास्त बोलली जात नसली तर तेथील लोकांना हिंदी चांगली समजते. उर्दू भाषेशी हिंदीचे साधर्म्य असल्याने आणि उर्दू पाकिस्तानची ही राष्ट्रभाषा असल्याने तसेच येथे बॉलीवूड चित्रपटांचे चाहते प्रचंड असल्याने हिंदी भाषा पाकिस्तानात प्रसिद्ध आहे.

नेपाळ ( Nepal ) - भारताचे नेपाळशी असलेले राजकीय - सांस्कृतिक संबंध, चित्रपट, संगीत सीमारेषा लागून असल्याने नेपाळमध्ये हिंदीचा प्रभाव आहे. हिंदी बोलली जात नसली तरी हिंदी नेपाळींना चांगली समजते आणि थोडक्यात हिंदी बोलणाऱ्याचे नेपाळमध्ये काही बिघडत नाही. भारतातून जाणारे पर्यटक तेथे हिंदी बोलून काम भागवू शकतात.

मॉरिशस ( Mauritius ) - मॉरिशस येथील शालेय जीवन आणि संस्कृती इव्हेंटमध्ये हिंदी भाषेचे स्थान आहे. येथे जाऊन वसलेले मूळच्या भारतीयांमुळे येथील कौटुंबिक परंपरेत हिंदी भाषेला स्थान आहे.

फिजी ( Fiji)- स्थलांतरीत भारतीयांमुळे फिजीत हिंदी खूप प्रसिद्ध आहे. आजही इंडो-फिजीयन ग्रुप हिंदी भाषेचा येथील अनेक घरात आणि सामाजिक स्तरात वापर केला जात आहे.

त्रिनिनाद आणि टोबॅगो ( Trinidad and Tobago ) - इंडो - कॅरीबियन हिंदूस्थानी कुटुंबात येथे हिंदी सणाला आणि भाषेला महत्व आहे. येथील लोक हिंदी भाषेत संवाद साधू शकतात.

गुयाना ( Guyana )- हिंदी येथील इंडो- गुयानाच्या घरात कल्चरल इव्हेंट आणि जुन्या परंपरेत हिंदी भाषेला स्थान आहे.त्यामुळे येथे हिंदी भाषेत संवाद साधला जात असतो.

सुरीनाम ( Suriname ) - दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला असलेला सुरीनाम देशात हिंदी भाषेशी मूळ असलेले लोक आहेत. त्यामुळे इंडो-सुरीनाम कुटुंबात आणि कल्चरलमध्ये हिंदी भाषेला महत्व आहे. 2012 च्या जनगणनेनुसार, हिंदुंची संख्या 22.3% आहे.