Diwali Padwa 2026: पाडव्याला बायकोला काय गिफ्ट द्यायचं? पत्नीसाठी निवडा या 5 हटके गिफ्ट्स; यंदाचा दिवाळी पाडवा बनवा खास

पाडव्याच्या दिवशी बायकोला काय भेट द्यायची, असा प्रश्न पडला आहे का? तिच्या आवडीनुसार निवडा या सुंदर आणि उपयोगी भेटवस्तू. दिवाळी पाडव्याला पत्नीला खास भेटवस्तू देऊन तिचा आनंद द्विगुणित करा.

| Updated on: Nov 09, 2026 | 3:57 PM
1 / 6
दिवाळी पाडव्याला बायकोला द्या हे स्पेशल गिफ्ट​ : दिवाळी पाडवा हा पती पत्नीसाठी एक खास सण असतो. या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते आणि नवरा तिला प्रेमपूर्वक एखादी भेटवस्तू देतो. आता बायकोला काय गिफ्ट द्यायचेहा प्रश्न प्रत्येक नवऱ्याला पडतो. त्यासाठी हा 10 गिफ्ट्स आयडिया पाहा.

दिवाळी पाडव्याला बायकोला द्या हे स्पेशल गिफ्ट​ : दिवाळी पाडवा हा पती पत्नीसाठी एक खास सण असतो. या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते आणि नवरा तिला प्रेमपूर्वक एखादी भेटवस्तू देतो. आता बायकोला काय गिफ्ट द्यायचेहा प्रश्न प्रत्येक नवऱ्याला पडतो. त्यासाठी हा 10 गिफ्ट्स आयडिया पाहा.

2 / 6

मॉर्डन आणि नाजूक दागिने : सोने किंवा चांदीचे पारंपरिक दागिने द्यायचे नसतील तर सध्या रोज गोल्ड पेंडेंट, डायमंड स्टड इअरिंग्स किंवा हलक्या वजनाची नाजूक सोन्याची अंगठी देण्याचा ट्रेंड आहे. म्हणजे हे दागिने सणासुदीलाच बाहेर न काढता ती रोज वापरू शकते. ते कायम तुमच्या प्रेमाची आठवण करून देतील.

3 / 6

कस्टमाईज्ड किंवा हॅन्डमेड भेटवस्तू :जुन्या फोटोंचा सुंदर कोलाज, तुमच्या दोघांच्या नावाचे इंग्रजी इनिशियल्स असलेले नाजूक पेंडेंट किंवा खास मेसेज कोरलेले लॉकट यांसारख्या भेटवस्तू तुम्ही देऊ शकता ज्या अमूल्य असतात.

4 / 6

​नाजूक सोन्याचे मंगळसूत्र​ :सध्या 1 ग्रॅम सोन्यात मिळणारे नाजूक, लहान पेंडेंट आणि मणी असलेले स्टायलिश मंगळसूत्र ट्रेडिंगमध्ये आहे. हे पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा स्पर्श देणारे उत्तम गिफ्ट आहे.

5 / 6

​डिझायनर हँडबॅग किंवा वॉलेट​ :तिच्या आवडीच्या ब्रँडची किंवा तिच्या स्टाईलला मॅच होणारी डिझायनर हँडबॅग किंवा वॉलेट एक उत्कृष्ट आणि उपयुक्त भेटवस्तू ठरू शकते, जी तिला नेहमी सोबत बाळगता येईल.

6 / 6

​स्पा वाऊचर किंवा वीकेंड ट्रिप​ :तिला जिथे फिरायला जायचं असेल त्या ठिकाणाची वीकेंड ट्रिप प्लॅन करा. किंवा हॉलिडेज प्लॅनिंग, हनिमून प्लॅनिंग करू शकता. एखाद्या लक्झगी स्पाचे वाऊचर देखील तुम्ही देऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us