Tips For Thicker Eybrows : आयब्रो इतके पातळ की दिसतच नाहीत? फक्त हे 5 उपाय करा आणि पहा कमाल
सतत थ्रेडिंग केल्यामुळे आयब्रोज खूप पातळ होऊन जातात. पातळ आयब्रोजमुळे संपूर्ण चेहऱ्याचा लूक बदलून जातो. त्यामुळे काही घरगुती आणि सोेपे उपाय करून तुम्ही तुमचे आयब्रोज घनदाट करू शकता. जाणून घ्या टिप्स

विटामिन ई: विटामिन ई मध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे केस गळती कमी होते रात्री झोपण्यापूर्वी विटामिन आयब्रोजला लावल्याने केस लांब आणि घनदाट होतील.
ऑलिव्ह ऑइल: आयब्रोजच्या केसांची वाढ एकदम हळूहळू होते. वाढ लवकर व्हावी म्हणून केसांना ऑलिव्ह तेलाचा वापर करू शकता, केसांना 5 ते 10 मिनिटे लावून नंतर धुऊन टाका
रोजमेरी तेल : आयुर्वेदिक उपचार म्हणून तुम्ही रोज मेरी चा वापर करू शकता. रोजमेरी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असते या तेलाने रात्री मसाज करून सकाळी चेहरा स्वच्छ धुवा
एलोवेरा जेल : एलोवेरा सौंदर्य प्रसाधनांमध्ये सर्वात महत्त्वाचा असतं. केसांपासून त्या पायाच्या नखांपर्यंत याचा वापर केला जातो. ताज्या एलोवेरा जेल नारळाच्या तेलात मिसळून लावा नियमितियाचा वापर केल्यास आयब्रो दिसतील
कांद्याचा रस : केसांसाठी कांदा खूप फायदेशीर असतो तसेच त्याचाच वापर करण्यासाठी देखील होतो कांद्याच्या रसात मध मिसळून आयब्रोजवर लावल्याने केस दाट आणि चमकदार होती
सतत थ्रेडिंग धोकादायक : सतत थ्रेडिंग किंवा प्लॅंकिंग केल्याने आयब्रो लवकर पातळ होतात त्यामुळे आयब्रोला नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी वेळ द्या
स्पूली ब्रशचा वापर : आयब्रोजला दररोज स्पूली ब्रशने ब्रश करा. स्वच्छ स्पूली ब्रशने दररोज 1 ते 2 मिनिटे आयब्रोजला ब्रश केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं