CM Devendra Fadnavis: मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतच घरे मिळायला हवी: CM देवेंद्र फडणवीस
जो मुंबईतला माणूस ३००, ३५० स्केअर फुट घरात राहत होता त्याला १२०० स्केअर फुटाचे घर मिळाले. आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळी घराच्या चाव्या देताना घरे पाहिले त्यावेळी हे लक्षात आले, " असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.

मुंबई: आज, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-१ रूपांतरण आदेश वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी निवारा परिषदेचे कौतुक केले तसेच मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादनही केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
“नागरी निवारा परिषद हा गरिबांना घर मिळावे यासाठी हा कायदा करण्यात आला होता. मात्र त्याचा गैरवापरही झाला. पण काही चांगली उदाहरणे त्याकाळात घडली. त्याअंतर्गत ६२५ कुटुंबांना घरे मिळाली, हे एक आपले स्वप्न होते. आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर १६०० प्रकल्प मुंबईमध्ये झाले. जो मुंबईतला माणूस ३००, ३५० स्केअर फुट घरात राहत होता त्याला १२०० स्केअर फुटाचे घर मिळाले. आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळी घराच्या चाव्या देताना घरे पाहिले त्यावेळी हे लक्षात आले, ” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.
“आम्ही हा प्रयत्न केला की मुंबईतला मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे. आज दक्षिण मुंबईतील मिल वर्कर वसई, वरार, कर्जतपर्यंत केले. पण आज आपल्या निर्णयामुळे या सर्व वसाहती त्याच ठिकाणी डेव्हलप करत आहोत. आज बीडीडी चाळ ही भारतातील सर्वात मोठा अर्बन प्रकल्प आहे. ज्यामध्ये १२० फुटात राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला आपण साडे चारशे ते सहाशे फुटाचे घर मोफत त्याच ठिकाणी दिले आहे. त्यांच्या जीवनात परिपवर्तन करण्याचे काम आपण केले आहे,” असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
दरम्यान, मुंबईला मुंबई म्हणून व्याख्यात करणाऱ्या ज्या वसाहती आहेत, त्या सर्व वसाहतींमधील लोकांना उत्तम जीवन मिळावे असा प्रयत्न आपल्या सरकारने केला. आता पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात याची मोहिम घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. हे जनतेचं आहे, जनतेला परत करायचे आहे, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आशिष शेलार यांचेही कौतुक केले.
