
जान्हवी किल्लेकरने कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र रंगवले. त्यासोबतच ती ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतही झळकली. पण जान्हवीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी 5’ व्या सीजनमुळे.

आज जान्हवी किल्लेकर हे नाव घराघरात पोहोचलं असून तिची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. जान्हवीच लग्न झालं आहे. तिला एक मुलगा आहे. 11 ऑक्टोबर 1994 साली ठाण्यात तिचा जन्म झाला.

जान्हवी किल्लेकर आता चर्चेत आली आहे ते तिच्या दिवाळी लूकमुळे. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निळ्या साडीतले एका फोटो शेअर केले आहेत. तिच्या या दिवाळी लूकने भल्या-भल्यांना घायाळ केलं आहे.

जान्हवी किल्लेकर ‘बिग बॉस मराठी 5’ व्या सीजनमध्ये सुरुवातीला निक्की, अरबाजच्या ग्रुपमध्ये होती. तिच्या अति आक्रमकतेमुळे ती चर्चेत आली. भांडखोर असा तिच्यावर ठपका पडला. पण खऱ्या आयुष्यात जान्हवी मात्र वेगळी आहे. संस्कारी सून आहे.

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिवाळीमधले काही फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर युजर्स भरभरुन कमेंट करत आहेत. जान्हवीचे फोटो पाहून एक युजरने लिहिलय 'मी काय आज जिवंत राहत नसतो...'. दुसऱ्या युजरने लिहिलय तुझे डोळे खूप सुंदर आहेत.