
बिग बॉसच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.अखेर या शोची सुरुवात जोरदार सुरुवात झाली आहे. सलमान खानने पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने सर्व चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

यंदाच्या सीझनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. घरातील बरेच निर्णय सदस्यांच्या हाती सोपवण्यात आले आहेत.बिग बॉसने सलमानला सांगितले की यावेळी तो कोणालाही थांबवणार नाही. स्पर्धकांना त्यांचे सर्व प्रश्न स्वतः सोडवावे लागणार आहेत. घरात लोकशाही असेल, म्हणजेच स्पर्धकच सर्वकाही ठरवतील.

बिग बॉसमध्ये एक लोकप्रिय जोडी पाहायला मिळाली. ही जोडी आहे आवाज दरबार आणि गर्लफ्रेंड नगमा मिरजकर ही जोडी आली आहे. सोशल मीडियावर ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे.

आवाज दरबार हा एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि डान्सर आहे, त्याचे इंस्टाग्रामवर 30 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने करोनाच्या काळात टिकटॉक डान्स व्हिडीओ शेअर करून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

टिकटॉक बंद झाल्यावर तो इंस्टाग्रामवर आला. यूट्यूबवर त्याचे 1.2 कोटींहून अधिक सबस्क्राइबर आहेत. दरबार हा प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. ज्यांनी हम दिल दे चुके सनम आणि देवदास सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

नगमा मिरजकर ही एक सौंदर्यप्रसाधक आणि कंटेंट क्रिएटर आहे, जी तिच्या प्रवास आणि सौंदर्य व्हिडिओंसाठी ओळखली जाते. तिचे इंस्टाग्रामवर 7 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आणि 10 लाखांहून अधिक यूट्यूब सबस्क्राइबर्स आहेत.

मिरजकरने अनेकदा दरबार आणि त्याच्या भावंडांसोबत डान्स व्हिडिओंमध्ये कामही केलं आहे. तसेच ते कपल आहेत हे सर्वांना माहित असलं तरी देखील या जोडीने यावर काहीही भाष्य केलं नाही.