
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. विशेष म्हणजे बिग बीचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. अमिताभ बच्चन यांचे इलाहाबादच्या ज्ञान प्रबोधिनी बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर नैनीताल शेरवूड कॉलेजमध्ये त्यांचे पुढील शिक्षण झाले.

अमिताभ बच्चन यांचे शिक्षण झालेले शेरवूड कॉलेज हे नैनीताल येथे आहे. विशेष म्हणजे हे कॉलेज अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असून पर्वत रांगामध्ये आहे.

शेरवूड कॉलेजची स्थापना 5 जून 1869 मध्ये झाली. या कॉलेजमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे प्रवेश घेऊ शकतो. अनेक प्रसिद्ध लोकांनी या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसतात.