
टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा घटस्फोट झालाय. तो पूर्व पत्नी नताशा स्टानकोविचपासून वेगळा झालाय. हे सर्व घडून एक-दीड महिनाच झालाय.

या काळात हार्दिक पांड्याच नाव तीन अभिनेत्रींसोबत जोडलं गेलय. अनंत अंबानींच्या लग्नात हार्दिकने अनन्या पांडे सोबत डान्स केला. म्हणून त्याच नाव अनन्यासोबत जोडलं गेलं.

काही दिवसांपूर्वी जॅस्मिन वालियासोबत हार्दिकच नाव जोडलं गेलं. आता बॉलिवूड अभिनेत्री इशिता राजने हार्दिक पांड्या आपला क्रश असल्याच म्हटलं आहे.

पांड्या मला खूप आवडतो हे सुद्धा तिने कबूल केलं. अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या चर्चेत आहे.

फिल्मीज्ञानला दिलेल्या इंटरव्यूमध्ये हार्दिक पांड्या आपल्याला आवडतो हे इशिता राजने सांगितलं. तिने पांड्याच भरपूर कौतुक केलं. तो एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे.

त्याला फलंदाजी करताना पाहण एक सुंदर अनुभव असतो. मी त्याच्यावर प्रेम करते. खरं सांगायच झाल्यास तो माझा सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे असं इशिता राजने सांगितलं.

हार्दिक पांड्याबद्दलच्या भावनांची कबुली देणारी इशिता राज त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. पांड्या 30 वर्षांचा तर इशिता 34 वर्षांची आहे.

इशिता दिल्लीला राहते. गार्गी कॉलेजमधून ग्रॅज्युएशनची पदवी घेतल्यानंतर इंग्लंडमध्ये तिने बिजनेसच शिक्षण घेतलं.

इशिताने 2011 साली प्यार का पंचनामा चित्रपटातून बॉलीवुडमध्ये एंट्री केली. या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने सोनू के टीटू की स्वीटी सारख्या चित्रपटात काम केलं. आतापर्यंत तिने 9 चित्रपटात काम केलय.