
अक्षय कुमार फक्त चित्रपटात स्टंट करतो असं नाहीय. खऱ्या आयुष्यात त्याला ज्या-ज्या वेळी संधी मिळाली, तेव्हा तो कधीही मागे हटला नाही. अक्षयने अनेक कठीण स्टंट सीन केले आहेत.

अक्षय कुमारने एकदा एका अभिनेत्रीला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं होतं. अक्षय कुमारमुळे ती अभिनेत्री मरता-मरता वाचली होती.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लारा दत्ता आहे. मिस यूनिवर्सचा किताब जिंकल्यानंतर लारा दत्ताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने अनेक हिट चित्रपटात काम केलय.

'अंदाज' हा लारा दत्ताचा पहिला चित्रपट होता. अक्षय कुमार, प्रियांका चोपरा या चित्रपटात लीड रोलमध्ये होते. या चित्रपटातील 'रब्बा इश्क ना होवे...' गाण्याच शूटिंग दक्षिण आफ्रिकेत झालं होतं. समुद्र किनारी या गाण्याच शूटिंग झालं होतं.

शूटिंग दरम्यान एक जोराची लाट आली आणि लारा समुद्रात खेचली गेली. अक्षयने मागचा पुढचा विचार न करता समुद्रात उडी मारली व या अभिनेत्रीला वाचवलं.