
अभिनेता रणबीर कपूरला ‘वडापाव’ खूप आवडतो. चित्रीकरणा दरम्यान बर्याचदा रणबीर वडापाव आणि चहाचा आस्वाद घेताना दिसतो.

बॉलिवूडचा चार्मिंग अभिनेता हृतिक रोशन त्याच्या फिटनेसबाबतीत अतिशय सजग असतो. मात्र, ‘समोसा’ हा त्याचा जीव की प्राण आहे. ‘मी एका बैठकीत डझनभर समोसे सहज खाऊ शकतो’, असे हृतिक रोशन म्हणतो.


‘डिंपल गर्ल’ दीपिका पदुकोण तिच्या फिटनेसमुळे प्रसिद्ध आहे. मात्र, दक्षिण भारतीय असलेल्या दीपिकाला पारंपरिक खाद्यपदार्थ खाण्याची आवड आहे.

अभिनेत्री वाणी कपूरदेखील ‘फूडी’ अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवनवीन पदार्थ खात असते.

‘पंगा क्वीन’ कंगना रनौतला देखील मसालेदार जेवण प्रचंड आवडते.