ब्रिटनच्या विरोधी पक्षनेत्या केमी बॅडेनॉक यांची जल्लोषात दिवाळी साजरी, लंडनच्या श्री स्वामीनारायण मंदिरात घेतलं दर्शन

फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. परदेशातील भारतीय नागरिकच नाही तर, ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या केमी बॅडेनॉक यांनी देखील जल्लोषात दिवाळी साजरी केली आहे. लंडनच्या श्री स्वामीनारायण मंदिरात त्यांनी दिवाळी साजरी केली. ज्याचे फोटो सध्या समोर आले आहेत.

| Updated on: Oct 24, 2025 | 12:54 PM
1 / 5
मंदिरात पोहोचल्यावर, बॅडेनॉक यांचे वरिष्ठ बीएपीएस स्वयंसेवक आणि समुदाय प्रतिनिधींनी उत्साहपूर्वक स्वागत केले. त्यांनी मंदिराच्या दैवी वातावरणाचे, नाजूक शिल्पकलेचे आणि "अन्नकूट" या भव्य प्रसाद प्रदर्शनाचे कौतुक केले.

2 / 5
भेटीदरम्यान, त्यांनी सीन नदीवरील पूल आणि पॅरिसमधील प्रसिद्ध स्थळांचे दर्शन घडवणारे एक सर्जनशील प्रदर्शन पाहिले. एवढंच नाही तर, फ्रान्समधील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर, ज्याचे उद्घाटन 2026 होणार आहे. याची झलक सादर देखील करण्यात आली होती.

3 / 5
यावेळी बॅडेनॉक यांनी भावना देखील व्यक्त केल्या, 'या आनंददायी सणात आपल्यासोबत सहभागी होणं हा माझ्यासाठी वैयक्तिक सन्मान आहे. ब्रिटनमधील हिंदू समुदाय शिक्षण, दानधर्म आणि सेवेद्वारे आपल्या देशाला समृद्ध करतो. तुमची श्रद्धा, कुटुंब आणि सेवा ही मूल्ये ब्रिटनच्या सर्वोत्तम गुणांचं प्रतीक आहे.'

4 / 5
बीएपीएस यूकेचे विश्वस्त संजय करा म्हणाले, “दीपावली आणि हिंदू नववर्ष साजरं करण्याच्या या पवित्र प्रसंगी केमी बॅडेनॉक यांचं नीस्डन मंदिरात स्वागत करण्याचा आम्हाला सन्मान लाभला. या महत्त्वाच्या प्रसंगी त्यांच्या उपस्थितीबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.'

5 / 5
बीएपीएस विषयी सांगायचं झालं तर, बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था ही एक जागतिक, स्वयंसेवक-चालित हिंदू संस्था आहे, जी अध्यात्म, चारित्र्यनिर्मिती, शिक्षण आणि मानवसेवेला समर्पित आहे. परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, बीएपीएस 70 हून अधिक देशांमध्ये समाजसेवा, एकतेद्वारे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करते.