
टेन्शन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोपण्याची अनिश्चित वेळ आणि फोनचा जास्त वेळ वापर ही सर्व आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीमध्ये हाय बीपी किंवा लो बीपीचा त्रास होऊ शकतो. शरीरात प्रेशर लेव्हल 90/60mm hg पेक्षा कमी झाले तर हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रशर म्हटले जाते. त्यामध्ये डोकेदुखीपासून अनेक समस्या उद्भवू शकतात. हाय बीपीप्रमाणेच लो बीपीही धोकादायक ठरू शकते. काही उपायांनी लो ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

मीठ : लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर डोकेदुखी, उलटी, मळमळ यासारखी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी त्वरित ब्लड प्रेशर चेक करावे आणि ते कमी झाले असेल तर मीठाचे अथवा मीठयुक्त पदार्थाचे सेवन करावे. हा एक आयुर्वेदिक उपचार आहे.

आवळा : लो ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांना चक्कर येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये आवळ्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे.

खजूर : ज्या लोकांना वारंवार लो ब्लड प्रेशरचा त्रास होतो, त्यांनी दुधासह खजूर खाल्ला पाहिजे. एक ग्लास दुधामध्ये खजूर घालून ते दूध उकळावे आणि प्यावे. यामुळे त्रास कमी होईल.

द्रव पदार्थ गरजेचे : लो ब्लड प्रेशरचा त्रास असो वा नसो , आपणा सर्वांनाच रोजच्या जीवनात अधिकाधिक द्रव पदार्थांचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे आपण हायड्रेटेड राहतो. खरंतर ज्या द्रव पदार्थांमध्ये पोटॅशिअम असेत, त्यांचे सेवन केल्याने लो बीपीचा त्रास कमी होऊ शकतो.