‘या’ 4 गोष्टींनी तुमचे डार्क सर्कल्स होतील गायब, जरूर करा वापर

जर तुम्ही डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त असाल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचाही वापर करू शकता.

| Updated on: Jan 25, 2023 | 12:14 PM
1 / 5
अनेक लोक डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त असतात. दीर्घकाळ स्क्रीन पाहणे, तणाव, झोप न लागणे आणि इतर अनेक कारणांमुळे डार्क सर्कल्स येतात. हे दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय करून पाहू शकता.

अनेक लोक डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त असतात. दीर्घकाळ स्क्रीन पाहणे, तणाव, झोप न लागणे आणि इतर अनेक कारणांमुळे डार्क सर्कल्स येतात. हे दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय करून पाहू शकता.

2 / 5

काकडी - काकडीचे तुकडे करून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर हे काप डोळ्यांवर किमान अर्धा तास ठेवा. त्यानंतर ते काढून टाका. याने डोळ्यांना आराम मिळेल. नियमित वापराने फरक दिसून येईल.

3 / 5

गुलाब पाणी - गुलाबपाणी टोनर म्हणून सर्रास वापरले जाते. एक कापसाचा गोळा गुलाब पाण्यात भिजवून डार्क सर्कल्स असलेल्या भागावर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते काढून टाका.

4 / 5

कोल्ड टी बॅग्ज - ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज फ्रीजमध्ये 30 मिनिटे ठेवा. यानंतर या बॅग्ज डोळ्यांवर 10 ते 15 मिनिटे ठेवा व नंतर काढून टाका. नियमित वापराने फरक पडेल.

5 / 5

गार दूध - दूध हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्रोत आहे. दुधात कापसाचा गोळा भिजवा आणि डार्क सर्कल्स असलेल्य भागावर ठेवा. ते किमान 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर काढून टाका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us