
भारताच्या चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो असतो. ज्या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो नाही, ती नोट भारतात चालत नाही. परंतु अनेकदा महात्मा गांधी यांचा नोटेवरील फोटो बदलता येऊ शकतो का? याबाबत जाणून घेऊ..

तसं पाहायचं झालं तर महात्मा गांधी यांची फोटो भारतीय चलनी नोटांवरून हटवता येऊ शकतो. अद्यापतरी भारत सरकार किंवा आरबीआयने महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवरून हटवण्याचा किंवा त्या फोटोमध्ये बदल करण्याचा विचार केलेला नाही. किंवा तसा कोणताही प्रस्ताव नाही.

आरबीआय अधिनियम 1934 या कायद्यात भारतीय चलनी नोटांविषयी नियम आणि कायदे आहेत. या कायद्यातील कलम 22 अंतर्गत देशात फक्त आरबीआयला चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार आहे.

म्हणजेच दुसरी कोणतीही संस्था स्वतंत्रपणे नोटांवर काय असेल हे ठरवण्याचा अधिकार नाही.नोटांवर कोणताही बदल करायचा असेल तर त्याविषयीची प्रकिया फक्त आरबीआयअंतर्गतच पार पडते.

विशेष म्हणजे नोटांच्या कोणत्याही बदलाबाबतचा आरबीआयने निर्णय घेतल्यास आरबीआय अधिनियमाच्या कलम 25 अंतर्गत केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतरच नोटांमध्ये बदल शक्य आहे.