दारुची बॉटल बॅगमध्ये ठेवून रेल्वेत बसताय, चुक केल्यास भयंकर…नियम काय सांगतो?

रेल्वेतून प्रवास करताना मद्याची बॉटल घेऊन जाता येणे शक्य आहे की नाही, असे नेहमीच विचारले जाते. परंतु यासाठी काही नियम आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

| Updated on: Nov 23, 2025 | 11:28 PM
1 / 6
देशातील बहुसंख्य लोक हे रेल्वेमधून प्रवास करतात. रेल्वेमधील प्रवास हा तुलनेने अधिक सुरक्षित मानला जातो. परंतु रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला वेगेवगळे नियम माहिती असणे गरजेचे आहे. असेच काही नियम हे मद्यासंबंधी आहेत.

2 / 6
रेल्वेमध्ये दारूची बॉटल घेऊन जाता येते का? रेल्वेत दारु पिता येते का? असे अनेक प्रश्न नेमही विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं ही अनेकांना माहितीही नाहीत. त्यामुळे रेल्वेतून दारुची बॉटल नेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नियम माहिती असणे फार गरजेचे आहे.

3 / 6
रेल्वेत मद्य घेऊन जाण्याबाबत काही नियम आहेत. रेल्वेच्या नियमांसोबतच वेगवेगळ्या राज्यांचे नियमही याबाबतीत लागू होतात. म्हणजेच रेल्वेत दारूची बॉटल घेऊन जायची असेल तर तुम्हाला रेल्वेच्या नियमांसोबतच त्या-त्या राज्यांचे कायदेदेखील माहिती असणे गरजेचे आहे.

4 / 6
रेल्वे अॅक्ट 1989 च्या कलम 165 नुसार रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या संशयास्पद सामानाची तपासणी करण्याचा अधिकार असतो. एखादे सामान संशयास्पद वाटले तर रेल्वेचे अधिकारी ते सामान जप्तदेखील करू शकतात. भारतात बहुसंख्य राज्यात रेल्वेमध्ये दारू घेऊन जाण्यास मनाईच आहे.

5 / 6
भारतात गुजरात, बिहार, नागालँड, लक्षद्वीप या ठिकाणी दारुबंदी आहे. त्यामुळे तुम्ही या राज्यांतून रेल्वेप्रवास करताना दारु घेऊन जाऊ शकत नाहीत. रेल्वेत मद्यपान करणे, मद्यपान करत असताना त्याचे प्रदर्शन करणे हे पूर्णपणे बेकायदा आहे. असे कृत्य केल्यास रेल्वे अॅक्टच्या कलम 145 नुसार तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो.

6 / 6
रेल्वेमध्ये बसून तुम्ही दारुबंदी असलेल्या राज्यात मद्याची बॉटल घेऊन गेले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. आर्थिक दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करताना शक्यतो मद्याची बॉटल घेऊन जाणे टाळायला हवे.