चवदार तळ्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, पाणी ओंझळीत घेऊन अनुयायांचं आंबेडकरांना अभिवादन

| Updated on: Mar 20, 2022 | 11:38 AM

20 मार्च 1927 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यातील ओंझळभर पाणी प्राशन करून अखंड मानव जातील पाण्याचा हक्क खुला केला. या ऐतिहासिक घटनेचा आज 95 वा वर्धापनदिन दिवस आहे.

1 / 6
20 मार्च 1927 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यातील ओंझळभर पाणी प्राशन करून अखंड मानव जातील पाण्याचा हक्क खुला केला. या ऐतिहासिक घटनेचा आज 95 वा वर्धापनदिन दिवस आहे. चवदार तळे येथील सत्याग्रहाच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी महाडमध्ये जमले आहेत. चवदार तळ्याचे पाणी ओंझळीत घेऊन जय भीमचा नारा देत अनुयायी चवदार तळे सत्याग्रहाचा आनंद व्यक्त करीत आहेत.

2 / 6
महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी 1927 मध्ये स्वतः नगरपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांनी सर्व सरकारी संपत्ती, सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सभा घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली आणि सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात प्रथम त्या तळ्यामधील पाणी प्यायले, आणि त्यानंतर जमलेल्या सर्वजणांनी तळ्याचे पाणी प्यायले.

3 / 6
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी पीडितांच्या हक्कांसाठी बाबासाहेब यांनी आजन्म लढा दिला. त्या सामाजिक लढ्यातील एक महत्वाचा लढा म्हणजे चवदार सत्याग्रहाचा लढा.

4 / 6
जनावरांपेक्षाही हीन पद्धतीची वागणूक ही दलित समाजाला दिली जात होती. गावाकुसाबाहेरच जिणं दलितांशिवाय कुणाच्याच वाट्याला आलं नव्हतं, कारण त्यांचा जन्म एका विशिष्ट जातीत झाला होता. वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या या समाजाला मुक्त करणे गरजेचे होते, म्हणून यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला.

5 / 6
 त्याकाळी उच्चवर्णियांकडून मिळणारी अपमानस्पद वागणून, गुलामगिरी, आणि निसर्गाची देणगी असणारे पाणीही अस्पृश्यांना पिण्याचा किंवा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. भारतात असणाऱ्या जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना हिंदूपासून वेगळे ठेवण्यात आले. पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारण्यात तर आलाच पण दलितांना मुख्य रस्त्यावरुन चालण्यास देखील त्या काळी मनाई करण्यात आली. मानवतावादाच्या दृष्टीकोनातूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्कांसाठी लढा कायम ठेवला.

6 / 6
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी होता. तो हिंदू समाजाच्या रूढी-परंपरांच्या विरोधी होता. तो एकाच वेळी सामाजिक सुधारणेचा लढा होता, आणि धर्मसुधारणेचाही लढा होता.