
जीवनात आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींचे पालन केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार गरजू व्यक्तीला नेहमी मदत करावी. जे इतरांना मदत करतात. त्यांना कधीही पैशाशी संबंधित समस्या येत नाहीत. जर तुम्ही दुसऱ्यांचे दु:ख समजू शकलात तर त्याहून मोठी कोणतीच गोष्ट नसते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार पती-पत्नीमध्ये प्रेम असेल तर घर नेहमी सुख-संपत्तीने भरलेले असते. ज्या घरात नेहमी कलहाचे वातावरण असते त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. घरातील वातावरण शांत कसे राहिल याचा विचार करा.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार परिश्रमाला कधीही घाबरू नये. कष्ट करणाऱ्यांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. अशा लोकांना पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही. त्यांना वेगळ्या मार्गानी पैसे येतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, कधीही अनावश्यक खर्च करू नये. तुमची बचतच तुमचा चांगला मित्र असते. त्यामुळे पैसे जपून वापरा.