
7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:01 वाजता चंद्रदेवाने धनु राशीत असताना उत्तराषाढा नक्षत्रात गोचर केले. मात्र, आता चंद्रदेव मकर राशीत आहेत. नक्षत्र गोचरानंतर त्याच रात्री 8:10 वाजता चंद्रदेवाने मकर राशीत प्रवेश केला, जिथे ते 10 ऑगस्टच्या पहाटे 2:10 पर्यंत राहतील. तर, 8 ऑगस्टच्या दुपारी 2:27 पर्यंत चंद्रदेव उत्तराषाढा नक्षत्रात असतील. या काळात अनेक राशींना चंद्राच्या कृपेने लाभ होईल. काही लोकांचे बिघडलेले नातेसंबंध सुधारतील, तर काहींना धनलाभामुळे मानसिक शांती मिळेल. याशिवाय, अनेक प्रकारे घरात आनंदाची चाहूल लागेल. चला जाणून घेऊया, गुरुवारी झालेल्या चंद्र गोचरामुळे कोणत्या तीन राशींना लाभ होण्याची शक्यता आहे.

चंद्रदेवाच्या विशेष कृपेने येत्या काही दिवसांत मेष राशीवाल्यांचे नशीब बळकट होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यापूर्वीपेक्षा चांगले गुण मिळतील, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पालकांना खूप आनंद होईल. व्यावसायिकांना परदेशी संपर्कांमुळे लाभ होईल आणि व्यवसायाचा विस्तार होईल. तर, नोकरी करणाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रयत्नांचे कौतुक होईल. याशिवाय, उत्पन्न वाढण्याचेही योग आहेत.

कर्क राशीवाल्यांवर काही दिवस चंद्रदेवाची कृपा राहील. बेरोजगार व्यक्तींचे परिश्रम फळाला येतील आणि त्यांना नवीन नोकरी मिळेल. अविवाहित लोकांना मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी कुटुंबप्रमुखाने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे बर्याच काळापासून नोकरी करत आहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मेष आणि कर्क यांच्यासह मकर राशीवाल्यांनाही ऑगस्ट महिन्यात चंद्राच्या कृपेने काही बाबतीत विशेष लाभ होईल. धार्मिक कार्यात रुची वाढल्याने वयोवृद्ध व्यक्तींना मानसिक शांति मिळेल. तसेच, त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. याशिवाय, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, ज्यामुळे प्रत्येकजण सुखी राहील. छोट्या-छोट्या गुंतवणुकीमुळे व्यावसायिकांना लाभ होईल आणि आर्थिक संकट दूर होईल. तर, नोकरी करणारे आणि दुकानदार यांच्या कुंडलीत वाहन खरेदीचे योग आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)