
चीझचे अनेक प्रकार असतात किंवा ते अनेक प्रकारे वापरलं जातं असं म्हणायला हरकत नाही. चीझचे खूप फॅन आहेत. काहीजण तर कधीही जा, कुठेही जा, काहीही खा चीझ टाकूनच खाणार. आपल्याला वाटतं चीझ खूपच अनहेल्दी आहे. पण असं नाही त्याचे अनेक फायदे आहेत.

चीझ खाल्ल्याने आतड्यांचं आरोग्य चांगलं होतं. आपण चीझ खाताना ते जंक फूडवर टाकून खातो पण हे चीझ तुम्ही नुसतंच खाऊ शकता. चीझ खाल्ल्याने पचन सुधारतं. चीझ मध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

ओमेगा -3 फॅटी ॲसिडमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. ओमेगा -3 फॅटी ॲसिडमुळे रक्तदाब कमी होतो, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, जळजळ कमी होते. हृदयाचं आरोग्य राखायचं असेल तर चीझ खाल्लेलं कधीही चांगलं. फक्त हे खाताना प्रमाणात खावं.

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर चीझ खायला हवं. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 12 आरोग्यासाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए संसर्गाशी लढतो आणि व्हिटॅमिन बी 12 लाल रक्त पेशींचं उत्पादन करते. यामुळेच रोगप्रतिकारशक्ती चांगली होते.

हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस हे महत्त्वाचे घटक आहेत. चीझ मध्ये हाडे मजबूत करण्यासाठी लागणारे सर्व घटक आहेत. कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास आणि ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करते. या प्रोसेस मध्ये फॉस्फरस कॅल्शियमची मदत करते.