
छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या सुखना धरणात पाणी नाही. आता या धरणात मृतसाठा आहे. या मृतसाठ्यात हजारो पक्षी आश्रयाला आले आहे. दुर्मिळ फ्लेमिंगोसह अक्षरशः हजारो पक्षी धरण परिसरात सध्या दिसत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच छोटे मोठे तलाव अटल्यामुळे सुखना धरणाच्या मृतसाठ्यावर पक्षी आश्रयाला आले आहे. हजारो पक्षांचा थवा सुखना धरणाच्या परिसरात तळ ठोकून आहे.

राज्यात मागील वर्षी पाऊस कमी झाला. यामुळे यंदा दुष्काळ निर्माण झाला आहे. या दुष्काळाचा पक्षांनाही मोठा फटका बसला आहे. पक्षी ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी जात आहे. सध्या धरणाच्या मृतसाठ्यावर पक्षी समाधन मानत आहे.

सुखना धरण परिसरात रोहित (अग्निपंख), चक्रवाक, चमचा (दर्विमुख), काळा करकोचा, पट्टकादंब (पट्टेरी राजहंस), राखी बदक, तलवार बदक, वेडा राघू, कुरव पक्षी, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी असे विविध पक्षी दिसून येत आहेत.

धरण परिसरात खंड्या, काष्ठ खाटिक, कोतवाल, नदीसुरय, राखी बगळा, कापशी घार, गप्पीदास, ठिपक्यांचा होला, शेकाट्या, पिवळा धोबी, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा हे पक्षी देखील येत असतात.