
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील जमनवाडी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जमनवाडीत एका तासाच्या पावसात सगळीकडे पाणीच पाणी झाले. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शेतांना तळ्याचे स्वरूप तर नद्या सुद्धा तुडुंब वाहू लागल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तुफान वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी घरावरची पत्रे उडाली. सखल भागात पाणी साचले. रहिवाशांच्या घरात पाणी घुसले. अचानक आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे गावकऱ्यांची धांदल उडाली.

वैजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात आता पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.

राज्यात मे महिन्यातही दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने पावसाचा खंड पडणार आहे, यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असा सल्ला दिला होता.