
छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. अशनूरनं वयाच्या 17 व्या वर्षी मोठं स्थान मिळवलं आहे.

काल अशनूरचा 12 वीचा निकाल लागला आहे आणि तिला 94 टक्के गुण मिळाले आहेत, त्यानंतर ही सुंदर अभिनेत्री पुन्हा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.

अशनूरच्या या यशाबद्दल चाहत्यांपासून सेलेब्सपर्यंत प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहेत.

2009 मध्ये, वयाच्या 5 व्या वर्षी, अशनूरनं झांसी की रानी या शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली.

यानंतर ती देवों के देव महादेव, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक शोमध्ये दिसली. पण सोनी टीव्हीच्या शो पटियाला बेब्स मधून अभिनेत्रीला विशेष प्रसिद्धी मिळाली.

या शोमध्ये मिनीच्या भूमिकेत दिसलेली अशनूर सौरभ जैनसोबत दिसली होती.

अशनूर आता सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सर्वांना वेड लावते. अशनूरची स्टाईल अगदी मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकते.