
अभिनेता कुशल बद्रिके... कुशल सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या पोस्ट तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आताही त्याने एक खास पोस्ट शेअर केलीय.

कुशल त्याची पत्नी सुनयना हिच्यासोबत सध्या कोकणात सुट्टीची मजा घेतोय. येवा कोकण आपलोच असा... असं म्हणत कुशलने सुनयनासोबचे फोटो शेअर केलेत.

कधी कधी पोहोचायचं कुठे? हे काही फार मॅटर करत नाही. प्रवास कुणा सोबत घडतो तेच महत्वाचं ठरतं!, असं म्हणत कुशलने हे खास फोटो शेअर केले आहेत.

कुशल सध्या सुट्टी इन्जॉय करतोय. पत्नी सुनयनासोबतचे कुशलचे हे खास फोटो... यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत कोकणात आहात, पण कोकणात नक्की कुठे? असा प्रश्न विचारला आहे.

कुशलच्या फोटोंवर चाहत्यांनी तसंच त्याच्या काही मित्रांनीही कमेंट केली आहे. छान, मस्त... आता चल रिहल्सलला ये!, अशी कमेंट हेमांगी कवी हिने केली आहे. यावर हसण्याची इमोजी शेअर करत कुशलने उत्तर दिलं आहे.